राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर-यावल मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.. या मतदारसंघातून प्रथमच नवयुवक रिंगणात उतरले आहेत..या मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिलीय तर दुसरीकडे महायुतीमधील भाजपने अमोल जावळे यांना संधी दिली आहे. त्यामुळे रावेरमधून कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. रावेर यावल मतदार संघात एकेकाळी भाजपची सत्ता होती.. मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी मारली..काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी या ठिकाणी विजयी झाले होते. आता शिरीष चौधरी यांच्या मुलाला धनंजय चौधरीला काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे माजी खासदार भाजपाचे निष्ठावंत स्व हरिभाऊ जावळे यांच्या मुलाच्या हातात भाजपाने उमेदवारी दिली आहे.
दरम्यान आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून शमीबा पाटील या मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. तृतीयपंथी यांना उमेदवारी दिली आहे. रावेर या मतदारसंघात सर्वाधिक पाटील समाजाचे वर्चस्व या ठिकाणी आहे. त्यानंतर आदिवासी आणि मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्याप्र माणावर आहे. त्यामुळे या मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..