राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना माहीम विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना रिंगणात उतरले आहे तर त्यांच्या विरोधात शिंदे सेनेने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली होती.. मात्र त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांच्यावर भाजपकडून दबाव आणला जात होता. पण ते आपल्या उमेदवारीवर ठाम असून आता माघार नाहीच.. स्टॅम्पवर लिहून देतो असं स्पष्टच सांगितलं आहे.
दरम्यान अमित ठाकरेंसाठी माहिम मतदारसंघातून माघार नाही म्हणजे नाही असं ठरवलं असून ते स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यास देखील तयार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेची ऑफर ही दिली आहे.. तसेच उमेदवारी मागे घ्यावे असे सूचनाही दिल्या आहेत.. मात्र आता त्यांनी स्पष्ट सांगितल्यामुळे माहीम मतदारसंघात तिहेरी लढतच होणार हे दिसून येत आहे..माहिम मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर, अमित ठाकरे आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत असा तिहेरी सामना यंदा माहिममध्ये रंगणार आहे.
या मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी सदा सरवण करांच्या उमेदवारीवरून प्रतिक्रिया दिली आहे.. ते म्हणाले या मतदारसंघातून त्यांनी माघार घेतलीच तर माझा फायदाच आहे.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरवणकरांच्या माघारीने त्यांची ती मतं ठाकरेंच्या शिवसेनेला जातील, असं शिंदेंच्या शिवसेनेतील काही नेत्यांचं मत आहे… त्यामुळे सरवणकरांचा अर्ज मागे घेणं म्हणजे त्याचा सावंतांना फायदा असल्याची चर्चा शिंदेंच्या गोटात सुरू आहे.