राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना शिंदे गट चांगलाच अडचणीत आला आहे.. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकमध्ये शिंदे गटाने आपल्या उमेदवारासाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्यामुळे शिंदे गट चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे.. राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना 29 तारखेला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या अवघ्या काही वेळ अगोदर शिंदे सेनेकडून दिंडोरीच्या धनराज महाले आणि देवळालीच्या राजश्री अहिरराव यांना पाठवण्यात आले होते.. आता या एबी फॉर्ममध्ये शिंदे गट चांगलाच अडचणीत आला असून याप्रकरणी निवडणूक आयोग म्हणून विचारला होता जिल्हा प्रशासनाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे.. आता या चौकशीमध्ये उमेदवार साठी किती एबी फॉर्म मागवण्यात आले..त्यासाठी किती खर्च आला तसेच अन्य बाबीची चौकशी करण्यात येणार आहे..दरम्यान विधानसभेच्या तोंडावर उमेदवारांना हेलिकॉप्टरन फॉर्म पाठवनं शिंदे सेनेच्या चांगलच अंगलट आलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य सामना रंगणार असून महायुती जोमाने मैदानात उतरले आहे.. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार येणार असा दावा वारंवार पक्षातील नेत्यांच्याकडून केला जात आहे.. आता या नाशिक मधील प्रकरणामुळे शिंदे सेनेला फटका बसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..