राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांना निवडणूक आयोगाचा मोठा धक्का बसला आहे. त्यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात मालमत्तेची लपवालपवी केल्याप्रकरणी आता त्यांच्यासोबत पत्राची तातडीने चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.. त्यामुळे त्यांचा टेन्शन वाढला असून सत्तार यांची उमेदवारी राहणार की रद्द होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे..निवडणूक आयोगाच्या चौकशीत सत्तार दोषी आढळल्यास सिल्लोडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
सिल्लोड सोयगाव मतदारसंघातुन अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रातील त्रुटींवर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी तब्बल 16 मुद्यांद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची निवडणूक आयोगाने (Election Commission) या गंभीर दखल घेतली.. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सतार आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.. तसेच या तक्रारीत त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे…
अब्दुल सत्तार यांनी दिलेली माहिती एकतर अपूर्ण किंवा चुकीची असल्याचे सांगितले जात आहे.. त्यामुळे आता त्यांचा अर्ज वैध ठरवण्याच्या आधीच हा अहवाल येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी राहणार की जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.