जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | रोटरी क्लब जळगाव इ लाईटच्या अध्यक्षपदी नितीन इंगळे तर मानद सचिव पदी संदीप असोदेकर यांची निवड करण्यात आली आहे. या क्लबचा सन २०२१-२२ या वर्षाचा पदग्रहण सोहळा दिनांक १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज मध्ये होणार आहे. या पदग्रहण सोहळ्यास पीडीजी राजू शर्मा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या क्लबच्या प्रेसिडेंट इलेक्ट्रिक पदी डॉ. पंकज शहा, उपाध्यक्षपदी अजित महाजन, सहसचिवपदी श्रेया कोगटा, सर्जेक्ट ॲक्ट आर्म पदी ऍड. पुष्कर नेहते, कोषाध्यक्ष सचिन चौधरी तसेच कार्यकारी संचालक म्हणून लक्ष्मीकांत मणियार, डॉ. मुर्तजा आंबिलेवाला, राजीव बियाणी, श्रीराम परदेशी, डॉ. वैजंती पाध्ये, डॉ. श्रीधर पाटील यांचा समावेश आहे.