राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना शिंदे गट चांगलाच अडचणीत आला आहे… या गटाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार धनराज महाले (दिंडोरी) आणि राजश्री अहिरराव (देवळाली) यांना एबी फॉर्म दिले होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गट चौकशीच्या फेऱ्यात अडकला होता त्यानंतर त्यांनी आता नाशिकच्या दोन उमेदवारांना माघार घेण्याच्या सूचना केल्या आहेत.. त्यानंतर आता त्यांची उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे हे उमेदवार नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने हे उमेदवार रिंगणात उतरले होते..मात्र त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणी चौकशीला सुरुवात झाली.. दरम्यान एबी फॉर्म पाठवणं शिंदी गटाच्या चांगलंच अंगलट आलं.. आता या सर्व प्रकरणानंतर त्यांनी माघार घेण्याच्या सूचना दिल्या आहेत…शिंदे पक्षाने घेतलेल्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात याची आता उत्सुकता आहे.
विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना आता या उमेदवारांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते त्यांचा शोध घेत आहेत. शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी या दोन्ही उमेदवारांची संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यात आज सकाळी माजी आमदार धनराज महाले यांचा ट्रेस लागला. मात्र त्यांचा फोन अद्यापही नॉट रिचेबल आहे.सौ. जयश्री अहिरराव यांचा शोध सुरू आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.