राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना झटका दिला आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावरच त्यांची बदली करण्यात आली आहे..
याआधी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होताच तब्बल २८ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तसेच राज्यभरातील ३०० हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. यात रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता विधानसभेची रणधुमाळी सुरू असतानाच रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे.
विरोधकांचे फोन टॅप केल्याच्या प्रकरणामुळे रश्मी शुक्ला या चांगल्या चर्चेत आल्या होत्या.. याआधी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रश्मी शुक्ला अवैध पद्धतीने फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केला होता. नवाब मलिक यांनी शुक्ला या भाजपच्या एजंट असल्यासारखं काम करतात, असा आरोप केला होता.त्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या.. दरम्यान विधानसभेच्या रणधुमाळीत केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचीं बदली करून त्यांना मोठा धक्का दिला आहे..