राजमुद्रा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपले असताना माहीम विधानसभा मतदारसंघात जागेवरून गोंधळ सुरूच आहे.. या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुत्र आम्ही ठाकरे यांना रिंगणात उतरले आहे.. तर दुसरीकडे महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात आहेत.. मात्र त्यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपकडून दबावतंत्र वापरले जात होते.. अर्ज मागे घेण्याला काही तास उरले असतानाही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे मागे न घेण्यावर ठाम आहेत. मात्र आता त्यांनी मनसे समोर ठेवली अट ठेवली असून मुंबईत महायुतीच्या विरोधातील सर्व उमेदवार मनसे मागे घेणार असेल तर आपण अडून राहणार नसल्याचं सरवणकर यांनी म्हटलं आहे. आता मनसे यावर काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..
गेल्या पंधरा वर्षापासून माहीम मतदारसंघात सदा सरवणकर हे आमदार आहेत. आगामी विधानसभेसाठी महायुतिकडून उमेदवारी मिळाल्यानंतर मी महायुतीचा उमेदवार आहे. या माहीम विधानसभा मतदारसंघात धनुष्यबाणाचा विजय होणार असून बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्नही पूर्ण होणार आहे.. मला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, आठवले यांचे आशीर्वाद आहेत. मी लोकांसाठी ३६५ दिवस काम करतो. मला माझे कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानायचे आहेत.. असे म्हटले होते..या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच सरकार येणार असून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे असेही त्यांनी म्हटले आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माहीम विधानसभा मतदारसंघातील मनसेने आमच्याविरुद्ध असलेले इतर सर्व उमेदवार मागे घ्यावेत, ही मी टाकलेली अट मान्य होत असेल, तर कार्यकर्त्यांशी बोलून अंतिम निर्णय कळवेन, असं सरवणकर म्हणाले. आता यावर मनसे माघार घेणार की आहे त्या निर्णयावर ठाम राहणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजपुत्र अमित ठाकरे हे विधानसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरले आहेत.. या निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.. आता त्यांच्यासमोर सदा सरवणकर यांचं आव्हान असणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..