राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.. अशातच आता जळगावच्या एरंडोल मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील नॉट रिचेबल असल्यानं भाजपचं टेन्शन वाढला आहे.ए. टी. पाटील शेवटच्या क्षणी माघार घेतात की? निवडणूक लढवणार ठाम राहतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एरंडोल मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार एटी नाना पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.. मात्र आज माघारीचा शेवटचा दिवस असून आज सकाळपासून ए टी पाटलांचा मोबाईल स्विच ऑफ असून ते जिल्ह्याच्या बाहेर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) लढत होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे.