राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.. या पार्श्वभूमीवर माहीम विधानसभा मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांची भेट नाकारली आहे. त्यामुळे सदा सरवणकर हे निवडणूक लढण्यावर ठाम असून माहीम मध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाल आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता.. मात्र या विधानसभेत माहीम मतदारसंघातून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता युती धर्म म्हणून भाजपने व शिवसेनेने अमित ठाकरे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सदा सारवाणकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र ते निवडणूक लढण्यावर ठाम होते.. अशातच सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांची भेट नाकारली. मला आता यावर काहीही बोलायचे नाही. तुम्हाला उभे राहायचे असेल. लढायचे असेल तर तुम्ही लढा असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.. ही भेट नाकारल्यानंतर सर्वांकर इरेला पेटले मी माझ्या मनाची तयारी केली होती. मात्र राज ठाकरे यांनी भेटच नाकारली. त्यामुळे माझ्या नाईलाज आहे. त्यामुळे आता मी ही निवडणूक लढणार आहे. असे स्पष्ट त्यांनी सांगितलं..
आता या माहीम मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, महायुतीतील शिंदेंच्या सेनेकडून सदा सरवणकर तर महाविकास आघाडी कडून महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. त्यामुळे माही मध्ये आता तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाला आहे.. या मतदारसंघात जनता कौल कोणाला देणार? अमित ठाकरे ना पाठिंबा मिळणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..