राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.. त्यांच्या या बदल्यानंतर आता विवेक फणसाळकर, संजय कुमार वर्मा आणि संजीव कुमार सिंघल डी.जी. पी (अँटी करप्शन ब्युरो) या तीन नावांची चर्चा होती. यामधील विवेक फणसाळकर यांची निवड झाली आहे. मुंबई पोलीस आयुक्त असलेल्या विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्य पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
विवेक फणसाळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलिस आयुक्तपदी निवड होण्याआधी महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते. तर २०१६-१८ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. दहशतवाद विरोधी पथकाचेही ते प्रमुख होते. ते मूळचे पुण्याचे आहे त्यांची अकोला येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक घेणे पहिली नेमणूक होती..
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅप केल्याची आरोप होते.. सातत्याने विरोधकांकडून त्यांची बदली करावी अशी मागणी केली जात होती.. त्यांच्या या मागणीवर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांची पदावरून उचल बांगडी करत त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती केली आहे..