राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना माहीम मतदारसंघात आता तिहेरी लढत होणार असल्याचं स्पष्ट झाल आहे. या मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात आहेत तर महायुतीतील शिंदेंच्या सेनेकडून सदा सरवणकर रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. या मतदारसंघात अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने महायुतीमधून त्यांच्याविरोधात उमेदवार नको असा सुर प्रसाद लाड, नितेश राणे, आशिष शेलार यांच्याकडून येत होता..मात्र आता राज ठाकरे यांच्याशी उत्तम वैयक्तिक संबंध असलेल्या आशिष शेलार यांनीही घुमजाव करत
सदा सरवणकर हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी भूमिका घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.. त्यामुळे आता भाजपची मतं कुठे जाणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.. यावर बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की,
महायुतीच्यादृष्टीने माहीमचा विषय संपला आहे. महायुतीचे उमेदवार आता सरवणकरच आहेत आणि महायुतीचा उमेदवार तोच आमचा उमेदवार असं स्पष्ट आशिष शेलार यांनी सांगितला आहे..त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात आगामी काळात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज ठाकरे यांनी बिनशर्थ पाठिंबा दिला होता. मात्र या विधानसभेत या मतदारसंघातून राज ठाकरेंची पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असले तरी त्यांच्या विरोधात महायुतीने उमेदवार दिला आहे.. दरम्यान हा उमेदवार देऊ नये असा सूर भाजपच्या नेत्यांकडून होता.. मात्र सरवणकर हे उमेदवारी लढण्यावर ठाम राहिले.. त्यामुळे .माहीम विधानसभा निवडणुकीत मनसेला पडद्यामागून गुप्तपणे रसद पुरवली जाणार का, हेदेखील पाहावे लागेल. याशिवाय, आशिष शेलार यांनी माहीममध्ये सदा सरवणकर यांना पाठिंबा देण्याची भाषा केल्याने त्यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील मनसेची मते कोणाकडे वळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.