राजमुद्रा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना भाजपच्या माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे.. त्यांनी आपल्या भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. अक्कलबुवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता..काल अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तसेच आज त्यांनी थेट पक्षालाच रामराम करत ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला धक्का दिला..
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील जागावाटपाच्या मुद्द्यावरून हिना गावित नाराज होत्या. भाजपकडून त्यांना या मतदारसंघात उमेदवारी हवी होती. मात्र महायुतीकडून ही जागा शिंदे सेनाला मिळाली. त्यामुळे येथे आमशा पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे त्या नाराज झाल्या.. आता या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या केसी पाडवी यांना मिळाली आहे. तर महायुतीत आमशा पाडवी रिंगणात आहेत. त्याचबरोबर डॉ.हिना गावित या देखील या मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे आता नंदुरबारच्या राजकारणात तिहेरी लढत रंगणार आहे… महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला निकाल लागणार आहे… यानंतरच विधानसभेत बाजी कोण मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.