राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना राजकीय पक्षांच्या नेत्यांच्याकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे.. अशातच आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडल आहे. तब्बल 50 ते 60 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले असल्यामुळे ठाकरे गट चांगलाच अडचणीत आला आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीत जळगावच्या एरंडोल मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे गेल्यामुळे ठाकरेंचे शिवसैनिक नाराज झाले… या मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटांनी लढवली नाही त्यामुळे नाराज असलेल्या कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्यांसह 50 ते 60 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिले.. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे..
एरंडोल मतदारसंघात अनेक वर्षापासून शिवसेनेनेच निवडणूक लढवली… मात्र या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना संधी मिळाली नाही.. यामुळे नाराज शिवसैनिकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.. आता शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नेमकी याबाबत काय भूमिका घेणार यापुढे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.. दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात यामुळे वादाची ठिणगी पडणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.