राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.. या मतदारसंघातुन काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे . त्यांच्या माघारीनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा झालेला संताप महाराष्ट्राने पाहिला आहे.पण ऐनवेळी मधुरिमा राजे यांनी माघार का घेतली याच कारण कोल्हापूर मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी यांनी सांगितल आहे..ते म्हणाले, काहीही ठरवून झालेलं नाही. राजू लाटकर यांच्या वडिलांचा फोन आला आणि मधुरिमाराजे यांनी माघार घेण्याचं ठरवलं. त्यांचा फोन माघार घ्यायला कारणीभूत ठरलेली आहे, असं ते म्हणाले..
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून मधुरीमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवरच
काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक बोलावण्यात आली..आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन करण्यात आलं. या बैठकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी यांनी प्रतिक्रिया दिलाी आहे.
या मतदारसंघातुन कोणत्याही परिस्थितीत राजू लाटकर हे माघार घेणार, हेच ठरलं होतं. ते पावणे तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात येणार होते. 2. 35 मिनिटांनंतर सगळं बदललं. मधुरिमा राजे यांना मी देखील विनंती केली होती की तुम्ही माघार घेऊ नका. मी त्यांना थांबवतोय म्हटल्यानंतर महाराज स्वत: आले. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. त्यामुळे उमेदवारी मागे घेणं गरजेचं आहे, असं म्हणत त्यांनी मला सुनावलं, असं सुनील मोदींनी म्हटलं. आता या माघारी मुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात वेगळच राजकीय वळण रागलं आहे..