राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून खळबळजनक घटना
समोर आली आहे., या मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते तसेच अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर आजच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी बोरगाव तालुक्यातील राजुरा गावाजवळ गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून गोळ्या ह्या त्यांच्या गाडीवर फायर झाल्यात असल्याने ते बचावले आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारांचा धुरळा उडवला आहे.. या पार्श्वभूमीवरच या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले विनोद सोनवणे यांच्या प्रचाराचा पहिलाच दिवस होता… प्रचारासाठी ते आज मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील राजुरा गावाला गेले होते.. दुपारी फोन तीन वाजता ते गावाबाहेर आला असता अज्ञात दोन मोटरसायकल स्वरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला त्यांनी बचाव म्हणून गाडीच्या सीटवर लपले आणि गाडीवर अंदा धुंद गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे..
मुक्ताईनगर तालुक्यातील राजकीय वातावरण या निमित्ताने ढवळून निघाले असून मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून विनोद सोनवणे यांची ओळख आहे.