राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना इंदापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगला वेग आला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.. तर त्यांच्या उमेदवारीला विरोध करत प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. आता या मतदारसंघातील वातावरण चांगलंच तापलं असून विधानसभेच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.. हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ मयूर पाटील यांनी त्यांची साथ सोडत अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
इंदापुरमध्ये मयूर पाटील यांचे चांगले राजकीय वर्चस्व आहे. यावेळी मयूर पाटील यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन देवकर यांनी देखील प्रवीण मानेच्या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिला. हळूहळू प्रवीण मानेंच्या परिवर्तन विकास आघाडीचा जनाधार वाढत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे..इंदापुरच्या हिंगणगावात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली. घोड्यावरून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रवीण माने, भरत शहा आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार गटाची साथ सोडली होती..आता शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर प्रवीण माने यांचा आव्हान असणार आहे.. या निवडणुकीच्या रिंगणात घरातल्याच व्यक्तींना विरोधी पक्षाच्या नेत्याला पाठिंबा दिल्याने हर्षवर्धन पाटलांना धक्का बसला आहे..