राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षाकडून प्रत्येक मतदारसंघात प्रचारांचा धडाका लावला जात आहे.. या पार्श्वभूमीवरच आता महायुतीने ही प्रचाराचा शुभारंभ केला असून कोल्हापूर मधील जाहीर सभेतून आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.. या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजाराहून 2100 रुपये करण्यासह विविध घोषणांचा पाऊस पडण्यात आला आहे..मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजनेसह रोजगाराबद्दलही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
माहितीच्या जाहीरनाम्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
१) राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही २१०० रुपये, पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती. २) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये. ३) प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी. ४) वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपयांची मदत. ५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार. ६) राज्यातील तरुणांना २५ लाख रोजगार देणार. ७) ४५ हजार पांदण रस्ते बांधणार. ८) अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना १५ हजार रुपये वेतन. ९) वीज बिलात ३० टक्के कपात. १०) शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार.
महायुतीच्या प्रचाराची पहिली प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यापूर्वी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांसह महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 कलमी कार्यक्रम सादर करत प्रचाराचे रणशिंग फुंकले.
दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीने बाजी मारत चांगलाच फटका दिला होता.. त्यामुळे ती भर भरून घेण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे.. त्यामुळे ही निवडणूक चांगली असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागला आहे..