राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे.. मात्र नाराज उमेदवाराकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढवली आहे.. दरम्यान भाजपने पक्षातच
बंडखोरी करणाऱ्या तब्बल ४० जणांची हाकालपट्टी केली आहे..यामध्ये बडनेरा तुषार भारतीय , नालासोपारा हरिश भगत मागठाणे गोपाल जव्हेरी ,सावंतवाडी विशाल परब, श्रीगोंदा सुवर्णा पाचपुते, अक्कल कोट सुनील बंडगर, अमरावती जगदीश गुप्ता, साकोली सोमदत्त करंजकर, जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणेयांच्यासह एकूण 40 जणांवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने १४८ जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काही ठिकाणी हक्काच्या जागा सोडल्या. त्यामुळे इच्छूक उमेदवार नाराज झाले होते. त्यांनी पक्षविरोधात जात बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली होती. पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपने बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले, पण काही जणांनी उमेदवारीवर ठाम राहत उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजपकडून कारवाई करण्यात आली.
धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील
जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे
अकोट – गजानन महाले
वाशिम – नागेश घोपे
बडनेरा – तुषार भारतीय
अमरावती – जगतीश गुप्ता
अचलपूर – प्रमोद गडरेल
साकोली – सोमदत्त करंजेकर
आमगाव – शंकर मडावी
चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे
ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली
अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल
नांदेड – वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे
घणसांवगी – सतीश घाटगे
जालना – अशोक पांगारकर
गंगापूर – सुरेश सोनवणे
वैजापूर – एकनात जाधव
मालेगाव – कुणाल सूर्यवंशी
बागलान – आकाश साळुंखे
बागलान – जयश्री गरुड
नालासोपारा – हरिष भगत
भिवंडी – स्नेहा पाटील
कल्याण – वरुण पाटील
मागाठणे – गोपाळ जव्हेरी
जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकरू
अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईल
नेवासा – बाळासाहेब मरकुटे
सोलापूर – शोभा बनशेट्टी
अक्कलकोट – सुनिल बंडकर
श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते
सावंतवाडी – विशाल परब