राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना सर्व राजकीय पक्षांच्या नेत्याकडून प्रशाळाचा राज्यभरात धुरळा उडवला जात आहे.. अशातच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते व राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगळ बुजवणी यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागली आहे उच्च जातीचा असतो तर मला असं वागवलं नसतं.. आता ईडीपासून मुक्तीसाठी भाजप बरोबर असा दावा त्यांनी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात केला आहे.. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत भुजबळांच्या दाव्याने महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात राज्यातील राजकारणावर भाष्य करण्यात आल आहे..यामध्ये छगन भुजबळ यांनी मी, नवाब मलिक, अनिल देशमुख तुरुंगात गेलो होतो. ईडीपासून सुटका हवी असेल तर आम्हाला भाजपसोबत जावं लागेल, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती. शरद पवारांनाही याबाबत माहिती होती, पण ते अनुकूल नव्हते. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला,असा दावा पुस्तकात करण्यात आला. त्यांच्या या दाव्याने आता महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण येण्याची शक्यता नाकारता येत नाही..
दरम्यान याआधी प्रफुल पटेल,सुनील तटकरे, हसन मुश्रीफ,अनिल देशमुख,अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशींना सामोरे जावं लागलं होतं.. मात्र तेव्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी भाजप बरोबर हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला.. भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला. कारण ईडीपासून सुटका…त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली आहे..