राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना जळगावातील शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.. बड्या राजकीय नेत्याची पोलिसांकडून 25 लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे.. या रोकड संदर्भात संबंधित व्यक्तीने योग्य ती माहिती न दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे .प्रमोद हिरामण पवार असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 500, 200 तसंच 100 च्या नोटांची सुमारे 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रोकड तो एका निळ्या रंगाच्या हॅन्डबॅगमध्ये घेऊन जात होता
.जळगाव शहरातील बोहरा गल्ली परिसरात गस्तीवर असलेल्या शनिपेठ पोलिसांच्या पथकाकडून त्याला अडवण्यात आलं..बॅगेत काय आहे अशी विचारणा केल्यावर त्याने मी शेतकरी आहे. माझ्याकडे खूप शेती आहे. मी जळगावात सोने घ्यायला आलेलो होतो. असं कारण सांगितलं होत…परंतु त्याच्या ताब्यात असलेल्या रोकड संदर्भात त्याने पोलिसांना ठोस माहिती दिली नाही. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शनिपेठ पोलीस ठाण्यात आणलं . यासंदर्भात प्रमोद पवार या व्यक्तीची सखोल चौकशी सुरू आहे.त्याने एवढी रक्कम कुठून आणली, ही रक्कम तो कुठे घेऊन जात होता, या संदर्भातील माहिती घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली आहे.