राजमुद्रा : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 13 जळगाव मतदार संघासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी,मतदान जनजागृती SVEEP कार्यक्रमा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सुरुवात जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील मनपा सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते व समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील,
सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त श्रीमती निर्मला (पेखळे), उपायुक्त श्रीमती धनश्री शिंदे , SVEEP नोडल अधिकारी तथा उपायुक्त श्रीमती अश्विनी गायकवाड (भोसले ) यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी सर्व मान्यवर अधिकारी व ,सर्व विभाग प्रमुख, सर्व शाखा अभियंता तसेच त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित आणि आयुक्त तथा प्रशासक श्री ज्ञानेश्वर ढेरे यांनी प्रतिज्ञा दिली.” मी प्रतिज्ञा करतो की, मी या देशाचा नागरिक असून संविधानाने मला दिलेला मतदानाचा हक्क माझ्या देशाच्या, राज्याच्या व स्थानिक पातळीच्या निवडणुकीत बजावणार. मला माझा व माझ्या देशाचा अभिमान आहे म्हणूनच मी मतदान करणार तसेच माझ्या परिवारातील, परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करेन. ”
या प्रसंगी पथनाट्याद्वारे 100% मतदान करण्याबाबत जनजागृती पर संदेश यावेळी देण्यात आला. सदर कार्यक्रमा प्रसंगी सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा युनिटचे सर्व शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता, प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 चे प्रभाग अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, आरोग्य विभागाचे सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व सर्व विभाग प्रमुखांच्या अधिपत्याखालील असलेले सर्व कर्मचारी वर्ग यांनी यावेळी आपली उपस्थिती नोंदवून सामूहिक शपथ घेतली.