राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भिवंडीत ठाकरे गटाला खिंडार पडलं असून भिवंडी ठाकरे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख व माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी ठाकरे यांची साथ सोडती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाळी म्हात्रे याचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या सभा होत आहेत. दरम्यान, या पक्षाकडून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली जात असताना या पक्षाला भिंवडीमध्ये मोठा झटका बसला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून भिवंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बळ वाढल आहे.म्हात्रे निवडणुकीसाठी भिवंडी पूर्व जागेसाठी इच्छुक होते..यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच त्याच्यावर शिंदे यांनी उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून या जागेसाठी समाजवादीचे रईस शेख हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळेच म्हात्रे हे नाराज होते. त्यानंतर आता तिने ठाकरेंना रामराम करून शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.. आता ते विधानसभेतून आपले नशीब आजमावणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
दरम्यान महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे..आता मतदानासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. प्रमुख नेत्यांचे आगामी दिवसांतील सभांचे नियोजन ठरले आहे… प्रत्येक मतदारसंघात राजकीय पक्षातील नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे..त्यामुळे भविष्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत.