राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिल आहे..या जिल्ह्यातील अक्कलकुवा अक्राणी विधानसभेत चौरंगी लढत होत आहे. दोन माजी मंत्री, एक माजी खासदार, विद्यमान आमदार विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दिग्दजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे..
या विधानसभा मतदारसंघात माजी खासदार हिना गावित माजी मंत्री असलेल्या के. सी. पाडवी यांच्या विरोधात रिंगणात उभ्या राहिल्या आहेत..दुसरीकडे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी यांना शिवसेना शिंदे गटांन महायुतीची उमेदवारी दिली आहे..काँग्रेसचे नेते आणि माजीमंत्री असलेले पद्माकर वळवी यांनाही या विधानसभेतून उमेदवारी आहे.. त्यामुळे या मतदारसंघात आता कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..
राज्यातील क्रमांक एकचा मतदार संघ असलेल्या अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठी लढत होणार आहे.
गेल्या 35 वर्षांपासून के. सी. पाडवी अक्कलकुवा विधानसभेचे आमदार आहेत. या मतदारसंघात यावेळी सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.. आता या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आक्रनी विधानसभा मतदारसंघात जनता कौल कुणाला देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.