राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना आता काँग्रेस बंडखोराविरुद्ध ॲक्शन मोडवर आली आहे..काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या 16 उमेदवारांचे 6 वर्षांसाठी निलंबन केले आहे. दरम्यान दुसरीकडे भाजपमध्येहही 37 विधानसभा मतदारसंघातील 40 नेते आणि पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सह भाजपने ही बंडखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
काँग्रेसकडून निलंबित करण्यात आलेले उमेदवार
भिवंडी – विलास पाटील आणि आसमा जव्वाद चिखलेकर, मिरा भाईंदर – हुंसकुमार पांडे, कसबा पेठ – कमल व्यवहारे,अहमदनगर शहर – मंगल विलास भुजबळ, कोपरी पाचपाखाडी – मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे, पलूस कडेगाव – मोहनराव दांडेकर, भंडारा – प्रेमसागर गणवीर, अर्जुनी मोरगांव – अजय लांजेवार,उमेरखेड – विजय खडसे, यवतमाळ – शबीर खान, राजापूर – अविनाश लाड, कटोल – याज्ञवल्क्य जिचकार, रामटेक – राजेंद्र मुळक, आमरोली – आनंदराव गेडाम आणि शिलु चिमूरकर, गडचिरोली – सोनल कोवे आणि भरत येरमे, बल्लारपूर – अभिलाषा गावतूरे आणि राजू झोडे
दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या 16 बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्यावर निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही कारवाई करण्यात आली आहे..