राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार अख्खा उत्तर महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रापैकी चार विधानसभा क्षेत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणात आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची जळगाव सह धुळ्यात तोप धडाडणार आहे. यामध्ये पाचोरा, शिंदखेडा, जामनेर मुक्ताईनगर आणि धरणगाव या ठिकाणी शरद पवार यांची तोफ धडकणार आहे. आता या सभेतून शरद पवार कोणावर निशाणा ठेवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे एरंडोल मतदारसंघातून अण्णासाहेब सतीश पाटील, जळगाव ग्रामीण गुलाबराव देवकर, जामनेर दिलीप बळीराम खोडपे तर मुक्ताईनगर अॅड खडसे रोहिणी एकनाथराव हे मैदानात आहे.त्यामुळे आपल्या व आघाडीच्या उमेदवारांना बूस्टर डोस देण्यासाठी शरद पवार हे जळगाव जिल्ह्यामध्ये पाच सभा घेत आहे. दरम्यान महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतदानाचा निकाल लागणार आहे..
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने जोरदार कंबर कसली असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत.. यासाठी ते उत्तर महाराष्ट्रातील पाच ठिकाणी सभा घेणार आहेत.. दरम्यान जामनेर मध्ये सातव्यांदा मैदानात उतरलेल्या भाजपाच्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या नवख्या दिलीप खोडपे यांनी आव्हान दिले आहे. तर मुक्ताईनगर मध्ये पक्षाचे अदलाबदल झालेले चंद्रकांत पाटील व रोहिणी खडसे हे पुन्हा समोरासमोर येऊन ठेपले आहेत. आता या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे उमेदवार गड राखणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..