राजमुद्रा : जळगाव येथील लघुउद्योग भारतीची बैठक रविवारी संध्याकाळी घेण्यात आली. बैठकीमध्ये राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणण्याचा संकल्प पदाधिकारी व सदस्यांनी केला.
बैठकीमध्ये लघु उद्योग भारतीचे विभागीय सचिव समीर साने, अध्यक्ष संतोष इंगळे, नंदूशेठ अडवाणी, माजी अध्यक्ष किशोर ढाके मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांचे स्वागत पदाधिकाऱ्यांनी केले.यानंतर अध्यक्ष संतोष इंगळे यांनी मनोगत व्यक्त करून, विकास कामांची कास धरणारे आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी राहण्याचे आवाहन केले
यावेळी आ. राजूमामा भोळे म्हणाले की, जळगाव शहरात एमआयडीसी आहे. ही एमआयडीसी अधिक विस्तारित करून तेथील असलेल्या समस्या पुढील पंचवार्षिक काळात सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे माझे व्हिजन आहे. आपल्याला आणखी एक एमआयडीसी मंजूर झालेली असून निवडणूक झाल्यानंतर तिचेही विस्तारीकरण होणार असल्याची माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिले. उद्योग व्यवसायांमध्ये बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याबाबत उद्योजकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही आ. राजूमामा भोळे यांनी केले.
यावेळी पाईप असोसिएशनचे पदाधिकारी रवींद्र लढा, भाजप उद्योग आघाडीचे कांती सानप, लघुउद्योग भारतीचे माजी अध्यक्ष रवींद्र फालक, हर्षल चौधरी, जयंतीभाई पटेल, महेश चौधरी, मानस बोरोले यांच्यासह लघुउद्योग भरतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.