राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार जोमाने मैदानात उतरले असून आज त्यांची जामनेरमध्ये सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका करत त्यांना चांगलाच इशारा दिला..म्हणाले, मंत्री महाजन यांच्या कारकिर्दीत मतदारसंघाचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांनी मतदारसंघात नेमके काय केले? असा प्रश्न पडतो.राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जनतेचे प्रश्न घेऊन गेले तर त्यांना दमदाटी करण्यात येते. चुकीची वागणूक दिली, तर खपवून घेणार नाही. याद राखा, “ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाबळी” या शब्दात पवार यांनी मंत्री महाजन यांना इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले या जामनेर मतदारसंघात अतिशय स्वच्छ प्रतिमा, सामान्यांसाठी कष्ट घेणारा, अभ्यासू, लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणारा आणि शिक्षकी पेशातील एक चांगला उमेदवार जामनेर साठी आम्ही दिला आहे. त्यांना विजयी करा. असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीनंतर जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक सबंध महाराष्ट्रात होऊ द्या. दुसरीकडे कुठेही होत नाही ते जामनेरकरांनी करून दाखवले, असा संदेश या माध्यमातून जाईल. त्यामुळे आमच्या या उमेदवाराला नक्की विजयी करा असा आव्हान देखील त्यांनी केलं.. मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या कारकिर्दी जनतेसाठी काय केलं आणि जनतेचे किती प्रश्न सोडवले… ते प्रश्न सोडविण्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांची आहे. मात्र ते याबाबत फारसे काही करताना दिसत नाही. असा हल्लाबोल शरद पवार यांनी जामनेर मतदारसंघात मंत्री महाजनांच्यावर लगावला..