राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाने रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे..रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नुकतंच जळगाव मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सदाभाऊ खोत यांना धक्का बसला आहे.. दरम्यान याआधी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारावर टीका केली होती.. ती टीका पटली नसल्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचाही सांगितला आहे..त्यामुळे शरद पवारांबद्दल वक्तव्य करणे त्यांना चांगलेच भोवलं आहे..
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात पक्षप्रवेश करतेवेळी पांडुरंग शिंदे यांनी सध्या सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लांब गेलेले आहेत. त्यांचे काम व्यक्ती केंद्रीत झाले आहे”, अशी टीका केली आहे.. तसेच
सध्या सदाभाऊ खोत यांच्या विषयी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. माझ्या संपर्कात जिल्ह्यातील 25 कार्यकर्ते आहे. तेदेखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील असा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला आहे. ऐन विधानसभेत रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का बसला आहे.
रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील जतमधील परिसरात एका प्रचारसभेत बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं..“देवेंद्र फडणवीस म्हणाले गायीचं सगळं दूध वासरांनाच देणार. मग शरद पवारांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या. अशा शब्दात त्यांनी वक्तव्य केलं होतं.. त्यांचे हे वक्तव्य आता त्यांना भोवलं असून आता त्यांच्याच रयत क्रांती संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षनी त्यांची साथ सोडली आहे.. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर त्यांना धक्का बसला आहे..