राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वडगाव शेरीत शरद पवारांनी मास्टर स्ट्रोक केला आहे.. या वडगाव शेरी मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपला मोठा धक्का बसला असून माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकात टिंगरे, हडपसरमधील दिलीप तुपे, अनिल तुपे तर खडकवासला येथील भाजपचे समीर धनकवडे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान पुण्यात शरद पवार गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे.. या पार्श्वभूमीवरच पुण्यातील वडगाव शेरीत भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे, हडपसर मतदारसंघातील संमित्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे, वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्या सह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे वजन वाढलं आहे..
दरम्यान या मतदारसंघात अडचणीत सापडलेले आमदार सुनील टिंगरे यांना मोठा धक्का बसला आहे.. कारण रेखा टिंगरे या वडगाव शेरी मतदारसंघातील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला खिंडार पडले आहे.