राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे.. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षातील नेत्यांच्या कडून प्रचारांचा धुरळा उडवला जात असताना आरोप प्रत्यारोपाच्या फेरीही झाडल्या जात आहेत.. अशा तसा आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे..पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांना महाराष्ट्र भीक घालत नाही. येताच पुढच्या सहा महिन्यात नरेंद्र मोदींचे सरकार डळमळीत होणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
दरम्यान संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील निवडणुकांकडे लागला आहे.. या महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच सरकार येऊन भाजपचा पराभव होणार आहे. नरेंद्र मोदी, अमित शाहा यांसह त्यांचे केंद्रीय मंत्रिमंडळ हे संपूर्ण राज्यात फिरतंय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात सरकार निवडून येणार आहे”, असे संजय राऊत म्हणाले.भाजप हा जाहिरातीवर तारलेला पक्ष आहे. जाहिरातबाजीवर खर्च करुन २०१४ साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले. हे त्या निवडणुकीनंतर त्यांचं सरकार पडणार अशी भविष्यवाणी त्यांनी केली..
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशाला मागे ओढण्याचे काम केले आहे. मोदींनी नवीन काहीही केलं नाही. कोणतीही निवडणूक असली तर भाजपवाले त्यांना प्रचारात उतरवतात. नाहीतर ते जागतिक दौऱ्यावर असतात. जगात फिरत असतात”अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे..