राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच वातावरण प्रचंड तापल असून राजकीय पक्षांच्या नेत्याकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही आपले शेकडो शिलेदार रिंगणात उतरले आहेत.. मात्र आता याच मनसेला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मोठा धक्का बसला आहे… नांदगाव मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून ठाकरे गटात प्रवेश केला आहे.. त्यामुळे राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने शंभरहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.. मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच नांदगावचे मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनीच निवडणुकीत माघार घेतली त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवार गणेश धात्रक यांना पाठिंबा जाहीर केला आहे.. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल असून मनसेला धक्का बसला आहे.. मनसेच्या शिलेदाराच्या माघारीनं नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे.
अकबर सोनावला यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने नांदगाव मध्ये त्यांना कितपत फायदा होऊ शकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी साबी आहे या म्हशीच्या नगरसेविका होत्या त्या मतदार संघात मनसेची मोठी ताकद जरी नसली तरी त्यांची समर्थक होते.. अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे..