राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून तिसऱ्या आघाडीत सहभागी झालेले आ.बच्चू कडु महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार करत आहेत..या पार्श्वभूमीवरच अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवाशातील सभेत बोलताना त्यांनी राज्यात सरकार कोणाचेही असो, पण ‘हुकूमत’ प्रहारची चालेल’, असा इशारा दिला आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत असली तरी छत्रपती संभाजीराजे, बच्च कडू आणि राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी राज्यात निवडणुकीच्या मैदानात आहेत. ही तिसरी आघाडी निवडणुकीत काय करिष्मा करते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान नेवाशातील भाजपशी बंडखोरी करत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. ते आपल्या विधानसभेतून नशीब अजमावणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
दरम्यान या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात त्यांनी शिवसेनायुबीटी पक्षाचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे यांना आव्हान उभं केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी जोमाने कंबर कसली असून तिसऱ्या आघाडीतून रिंगणात असलेले बच्चू कडू यांनी आम्ही सत्तेत असो किंवा नसो, पण ‘हुकूमत’ आमचीच असणार असा इशारास महायुतीसह महाविकास आघाडीला दिला आहे.. आता या विधानसभा निकालानंतर तिसरी आघाडी निवडणुकीत बाजी मारणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..
प्रहार चे आमदार बच्चू कडू यांनी बोलताना माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे उदाहरण दिले. देवेगौडा यांच्याप्रमाणे उमेदवार कमी निवडून आले, तरी ‘हुकूमत’ त्यांचीच होती. तशीच यावेळी ‘हुकूमत’ आमचीच असणार आहे”.असे ते म्हणाले आहेत..