राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना अमळनेर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांना संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेसने अनिल शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर भाजपचे बंडखोर नेते अपक्ष शिरीष चौधरी रिंगणात आहेत.. त्यामुळे या मतदारसंघातील तिहेरी लढतीत विजयाचा गुलाल कोण उधळणार हे विधानसभा निकालानंतर स्पष्ट होणार आहे..
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला सर्व विधानसभांमध्ये मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकूण 11 मतदार संघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वाधिक चर्चेत असलेला खानदेशातील अमळनेर मतदारसंघ.. या मतदारसंघात सत्ता महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक राहिले असताना संपूर्ण खान्देशमध्ये अमळनेर विधानसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. कारण 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत अनिल पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात होते. त्यांच्यासमोर शिरीष चौधरी हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. यावेळी शिरीष चौधरी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. या विधानसभा निवडणुकीत लोकांनी राष्ट्रवादीला साथ दिली.. दरम्यान आता महाराष्ट्रातील अमळनेर विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 15 व्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघातून अनिल पाटील, डॉ अनिल शिंदे की शिरीष चौधरी? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.