चोपडा राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकासाठी काही दिवस शिल्लक राहिले असताना चोपडा विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.. चोपडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अमृत भाई सचदेव यांच्या दुकान व कार्यालयाबरोबर पोलीस महासंचालक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कार्याल्यावर धाड टाकण्यात आली.. त्यांच्या कार्यालयात दहा कोटीची रक्कम असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला.. मात्र अशी कोणतीही रक्कम त्या ठिकाणी आढळून आलेले नाही..
दरम्यान त्यांनी ही रक्कम उमेदवार सोनवणे यांच्या वाटपासाठी ठेवलेली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता..मात्र पोलिसांनी केलेला हा आरोप खोटा निघाला व तपासात कोणतीही रक्कम सापडली नाही.. दरम्यान या घटनेनंतर अमृत भाई सचदेव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, निवडणुका तोंडावर आल्या असताना हे दडपशाहीचे लक्षण असून विरोधकांना दडवण्यासाठी ही कृत्य करण्यात आलं आहे .. दरम्यान या घटनेने घाबरून न जाता विचलित होता न जोमाने कामाला लागू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला..
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाची राज्यात सर्वाधिक चर्चा आहे. महाराष्ट्रातील चोपडा विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 10 व्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे आणि प्रभाकर सोनवणे यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे या चोपडा मतदारसंघात विजयाचा गुलाल कोण उधळणार हे विधानसभा निकालानंतर स्पष्ट होणार आहे..