राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काही दिवस शिल्लक राहिले असतानाच पुण्यातील महाविकास आघाडी बिघाडी निर्माण झाली आहे..पुण्यातील हडपसर मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचा महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे..
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची दिवसेंदिवस ताकद वाढत आहे. त्यातच आता शिवसेनेचे माजी आमदार बाबर यांनीही त्यांना पाठिंबा जाहीर केला असल्यामुळे त्यांची ताकद आणखीनच वाढली आहे.. हा पाठिंबा जाहीर करतेवेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्ती केली की , गंगाधर बधे यांनी शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहून अनेक नागरिकांच्या मदतीला धावून प्रश्न सोडवण्याचे काम केले. आम्ही दोघेही शिवसैनिक आहोत. त्यामुळे गंगाधर हेच महादेव आहेत आणि गंगाधर हेच शक्तिमान आहेत. त्यामुळे मतदारांनी गंगाधर बधे यांना महादेव बाबर समजूनच मोठ्या बहुसंख्येने मतदान करावे, असे आव्हान त्यांनी केले आहे… या मतदारसंघात आमदार बाबर यांनाही मानणारा शिवसैनिक व मतदार वर्ग मोठा आहे. पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याकरता आम्ही शिवसेना गंगाधर बधे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उभे केले आहे. असे त्यांनी म्हटलं.
दरम्यान महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल स्पष्ट होणार आहे… या निवडणुकीच्या पार्श्वभूमीचा असणारा प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आला असून महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला आहे..