राजमुद्रा : निवडणुकीचा प्रचार संपायला 48 तास शिल्लक राहिले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना चांगलच डिवचलं आहे.”महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ आता ‘गुजरात नवनिर्माण सेना’ झाली असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या पक्षावरच टीका केली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना मनसेचा गुनसे असा उल्लेख करत राज ठाकरेंवर टीका केली आहे..या सभेत बोलताना ते म्हणाले महाराष्ट्र लुटून गुजरातला नेण्याचा प्रकार सुरू झाला तेव्हापासून माझा प्रचार सुरू झाला.. मी मुख्यमंत्री असताना कटिंग के बटेंगे असे नव्हते त्यांची सत्ता घेतली होती तिथेच लुटेंगे बाटेगे आहे हीच त्यांच्या मनसेची भूमिका असं म्हणणं राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंनी तोड डागली.. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले, गुजरातला हे लोक ढोकळा खायला गेले. ठाण्यातली मिसाळ खायची ना, काही लोकांना मिसळ खूप आवडते. त्यांनी मागच्यावेळी बिनशर्ट पाठिंबा दिला आणि आता इनशर्ट पाठींबा दिला आहे. असा हल्लाबोल त्यांनी भर सभेत मनसेवर लगावला होता..
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली.ठाणे हे गद्दारीचं केंद्रबिंदु आहे, इथे मशाल लावली तर संपूर्ण महाराष्ट्र गद्दार मुक्त होईल, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath shinde) टीका केली.