चोपडा राजमुद्रा : निवडणुकीच्या धावपळीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर सोनवणे एकदा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे प्रकृती गंभीर झाली होती निवडणुक कुठल्याही अडथळा न येऊ देता त्यांचे नातवंडे असलेल्या हितेश सोनवणे व कुणाल सोनवणे या दोन्ही नातवंडांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघ पालथा घातला आहे.
विधानसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना फुटी नंतर प्रथमच विद्यमान आमदार लता सोनवणे यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. महायुती शिंदे गटाकडून चंद्रकांत सोनवणे उमेदवारी करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उबाटा गटाकडून प्रभाकर सोनवणे हे उमेदवारी करीत आहे. महाविकास आघाडी कडून प्रभाकर सोनवणे यांना शिवसेना उमेदवारी देत चोपडा विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात रंगत आणली,
आजोबा प्रभाकर सोनवणे हे रुग्णालयात उपचार घेत असताना जनतेच्या सतत संपर्कात राहून या दोन्ही नातवंडांनी मात्र जनतेच्या संपर्कात राहून आजोबांच्या प्रचारावर भर दिली आहे. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हितेश आणि कुणाल जनतेला भावनिक साद घालत असताना आशीर्वाद आणि पाठिंबा देण्याचे आवाहन करीत आहे.
आजोबा प्रभाकर सोनवणे यांच्या प्रकृतीची काळजी घेत संपूर्ण परिवाराने प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. आजोबा साठी नातवंडांचा जनतेपर्यंत पोहोचण्याचा संघर्ष तसेच मैदानात उतरल्याची संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगत आहे.