बोदवड राजमुद्रा वृत्तसेवा | इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. भाजपा सरकारने घरगुती वापराच्या गॅस, खाद्यतेल आणि डिझेल-पेट्रोलच्या केलेल्या विक्रमी दरवाढीच्या निषेधार्थ बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. तसेच बाजार समिती ते तहसील कार्यालय दरम्यान वाहने ढकलत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात तालुकाध्यक्ष डॉ. उद्धव पाटील, मधुकर राणे, कैलास चौधरी, रामदास पाटील, सईद बागवान, दीपक झांबड, सागर जयस्वाल, महिला तालुका अध्यक्ष वंदना पाटील, डॉ. काजळे, अतिश चौधरी, वामनराव ताटे, प्रदीप बडगुजर, कल्पेश शर्मा, सतीश पाटील, भगतसिंग पाटील आदी सहभागी झाले होते.