राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना खानदेश मधील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक चर्चा रंगली आहे या मतदारसंघात महायुतीची उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा प्रचार दौरा प्रचंड प्रतिसादामुळे लक्षवेधी ठरत असून, जिथे तिथे या रॅलीचीच चर्चा होत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीत काँग्रेसने त्यांच्या विरोधात अनिल शिंदे यांना रिंगणात उतरले आहे.. मात्र निवडणुकीच्या धाकधुमीत मंत्री अनिल पाटील यांचा प्रचार जोमाने होत आहे.. या मतदारसंघात भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपूर्ण शहरात अनिलदादांना प्रतिसाद मिळत असल्याची भावना माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार व माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली.
या मतदारसंघात अनिल पाटील यांनी शहर व ग्रामीण भागात केलेल्या उल्लेखनीय विकासकामांमुळे हा प्रतिसाद असून, विशेष करून बाजारपेठेत झालेले सर्व रस्ते, गुंडगिरी कमी झाल्याने व्यापारी बांधवांचा संपलेला त्रास यामुळे व्यापारी व व्यावसायिक बांधव प्रचंड खूश आहेत.दरम्यान, प्रचारफेरीत भाजयुमोच्या भैरवी वाघ-पलांडे यांचा देखील सहभाग होता. एकंदरीत सारे शहरच अनिल पाटील यांचे समर्थन करीत असल्याचे हे चित्र असून, कदाचित संपूर्ण शहरातून रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि मोठे मताधिक्य त्यांना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे..
दरम्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत अनिल पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात होते त्यांच्यासमोर शिरीष चौधरी हे अपेक्षा उमेदवार म्हणून विजयी झाले होते.. यावेळी श्री चौधरी भाजपच्या तिकडे निवडणूक लढवत आहे या विधानसभा निवडणुकीत लोकांनी राष्ट्रवादीला साथ दिली.. अन राष्ट्रवादीचे अनिल पाटील विजयी झाले.. आता या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही पुन्हा एकदा अनिल पाटील यांचाच गुलाल उधळणार असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे..
कोरोना काळात मंत्री अनिल पाटील यांनी जनतेची अहोरात्र केलेली सेवा लोक अजून विसरलेले नसून अनेक प्रभागात नागरिकांनी याबाबत भावना बोलून दाखविल्या आहेत. अनेक भागात झालेला विकास आणि मंजूर झालेली १९७ कोटींची दररोज पाणी देणारी योजना यामुळे महिला वर्गही खूश आहे.