राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही तासंच राहिले असताना काल प्रचारतोफा थंडावल्या..या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्याकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.. या पार्श्वभूमीवरच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. उद्धव ठाकरे जणू मी बाळासाहेब ठाकरे असल्यावरच वावरत आहेत.. त्यांना त्यांची सरही येणार नाही असं टीकास्त्र शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सोडल आहे.
या विधानसभा निवडणूकीनंतर उद्धव ठाकरेंचं पितळ उघड पडणार आहे…ते बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत. हातामध्ये रुद्राक्ष बांधताहेत, जणू मी काय बाळासाहेब ठाकरेच आहे.. पण बाळासाहेबांची सर त्यांना येणार नाही अशी टीका त्यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना फोडण्याचं पाप केलं असा आरोपही कदम यांनी केला.खेड रत्नागिरीमध्ये बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. कालपर्यंत उद्धव ठाकरेंनी वाघाचं चामडं घातलंय असा अविर्भाव होता ते आता उघड पडलंय अशी टीका कदम यांनी केली.
या निवडणुकीत महायुतीच्या ( शिवसेना भाजप राष्ट्रवादी) किमाना 170 जागा येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.उतारवयात मनोहर जोशींना स्टेजवरून भर जाहीर सभेत उतरवायला भाग पाडलं. माझ्या बाबतीतही त्यांनी तसाच प्लॅन केला होता पण मला एकनाथ शिंदेंनी वाचवलं, असं म्हणत कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.