राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकीला काही तास शिल्लक राहिले असताना भाजपा आणि बहुजून विकास आघाडीत आरोप प्रत्यारोप यांना उधाण आलं आहे. बहुजन विकास आघाडीने भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करण्यासाठी विरार येथील मनोरीपाडा येथील हॉटेल विवांत येथे आले होते . असा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
या निवडणुकीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे बहुजन विकास आघाडीने म्हटलं आहे.यावेळी विनोद तावडेत्यांच्या सोबत भाजपचे उमेदवार राजन नाईक व काही पदाधिकारी होते. त्यांच्यात बैठक सुरू असतांना बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते ही थेट या हॉटेलमध्ये घुसले. यावेळी तावडे हे पैसे वाटत होते. असा आरोप बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील एक वेगळी चित्र समोर आलं आहे… दरम्यान आता प्रचार संपला आहे. त्यानंतर देखील विनोद तावडे हे मतदार संघात कसे आहेत? मतदानाच्या ४८ तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे त्यांना माहीत नाही का ? असा सवाल देखील ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
तर दुसरीकडे विनोद तावडे हे बहुजन नेतृत्व आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत यांचा जवळचा संबंध आहेत.. त्यामुळे त्यांचा भाजपमधूनच गेम करण्यात आल्याचा नेतृत्व संपवण्याचा डाव अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे..