राजमुद्रा : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून प्रत्येक नागरिक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बाजवताना दिसत आहे. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहेत . राज्यातील 4,136 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान ठरवणार आहे.. संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना होत आहे त्यामुळे दिग्दजाची प्रतिष्ठान निवडणुकीत पणाला लागली आहे..निवडणुकीत बारामती, इंदापूर, दौंड,नांदेड,येवला कवठेमहांकाळ माहीम, वरळी,कराड दक्षिण,कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागला आहे..
या निवडणुकीत महायुतीत भाजपा 148 जागा लढवत आहे. तर शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी 53 जागांवर निवडणूक लढवित आहे. काँग्रेस 103, शिवसेना (उबाठा) 89 जागांवर लढत आहे. तर राष्ट्रवादीचे (एसपी) 87 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षानं 237 उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार 128 जागांवर निवडणूक लढत आहेत. काँग्रेसची राज्यभरात किमान 75 जागांवर थेट भाजपाबरोबर, सुमारे 41 जागांवर राष्ट्रवादी (एसपी) विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. तर सुमारे 53 जागांवर शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.
गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रचंड राजकीय हालचाली घडल्या आहेत. तसेच या निवडणुकीतून हे स्पष्ट होईल की जनता कोणत्या दृष्टीकोनाने पाहते, जनतेचं मत नेमकं कुणाच्या बाजूने आहे. याआधीही जनतेने लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने सर्वाधिक मतदान केलेलं बघायला मिळालं होतं. मात्र लोकसभेनंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सारख्या योजना महायुती सरकारकडून जाहीर झाल्या आहेत.याकारणामुळे निवडणुकीमध्ये मोठा उलटफेर होतो का? या गोष्टीकडे लक्ष देणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.