राजमुद्रा : राज्यातील 288 विधानसभा मतदार संघासाठी आज मतदान होत आहे.. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची राज्यात सर्वाधिक चर्चा आहे.. या मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. आजचा दिवस पुढील ५ वर्षांचे भवितव्य ठरविणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चाळीसगाव वासीयांनी आवर्जून मतदान करावे व चाळीसगावच्या स्मार्ट विकासासाठी हातभार लावावा.. असे आव्हान त्यांनी केले..
महाराष्ट्रातील चाळीसगाव विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 17 व्या क्रमांकावर आहे.. या मतदारसंघातून मंगेश चव्हाण आणि उन्मेश पाटील यांच्या थेट लढत होणार आहे त्यामुळे यंदाची निवडणूकिकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..