राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केलेल्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.. राज्यातील विधानसभा निवडणुकीत बिटकॉइन विकून पैशांचा वापर केला असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंसह नाना पाटोळे यांच्यावर करण्यात आला..दरम्यान, यावर खासदार सुळे यांनी सोशल मीडियात पोस्ट करून त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत.
त्या म्हणाल्या, निवडणुकीच्या तोंडावरच मतदारांची दिशाभूल करण्यासाठी असे खोटे आरोप करण्यात येत आहेत..”मतदानाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचे आरोप करणं नेहमीचं झालंय. बिटकॉइन गैरव्यवहाराच्या खोट्या आरोपांविरुद्ध आम्ही केंद्रीय निवडणूक आयोग तसंच सायबर गुन्हे विभागाकडं फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामागील हेतू आणि दुष्प्रवृत्ती पूर्णपणे स्पष्ट आहेत. भारतीय राज्यघटनेनं मार्गदर्शन केलेल्या सक्षम लोकशाहीमध्ये अशा घडत आहे. याचा निषेध करणं योग्य आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दरम्यान या आरोपाविरुद्ध काँग्रेसनं भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजप नेते तथा आमदार प्रविण दरेकर, कथित बिटकॅाईन घोटाळ्याचा आरोप करणारे रविंद्रनाथ पाटील यांच्याविरोधात सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.. तर दुसरीकडे यावर राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणले आहेत.. ज्या माजी आयपीएस अधिकाऱ्याने तक्रार केली तो अधिकारी एकेकाळी जेलमध्ये होता.. त्याच्या म्हणण्याला एवढं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही असा पलटवार पवार यांनी केला आहे..
मतदान दिनाच्या पूर्वसंध्येला आरोप झाल्यानं विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करून फेक न्यूज पसरवल्याचा दावा करत काँग्रेस आक्रमक झाली आहे.