राजमुद्रा : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे.. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.. जिल्ह्यातील जळगाव शहर युतीचे भाजपा उमेदवार सुरेश भोळे यांच्यासह माजी मंत्री सुरेश जैन यांनी मतदानाचा आज अधिकार बजावला..
गेल्या 35 वर्षापासून सुरेश दादा जैन हे जळगाव शहराचे आमदार होते.मात्र सुरेश भोळे यांनी त्यांचा पराभव करत ती विजयी झाले होते
मात्र आता गेल्या दहा वर्षापासून आमदार सुरेश भोळे हे जळगावचे प्रतिनिधित्व करीत आहे.. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय झालेले महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुरेश दामू भोळे ( राजू मामा ) यांना पुन्हा भाजपाने तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे.. आज त्यांनी मतदान केंद्रावर माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावल्याने चर्चांना उधाण आलं.. या मतदान केंद्रावर दोघे एकत्र सोबत आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं..
दरम्यान माजी मंत्री सुरेश जैन सक्रिय राजकारणात नसले तरी उबाटा गटामध्ये नेते आहेत.यावेळी सुरेश दादा जैन यांच्या पत्ती रत्न जैन यादेखील उपस्थित होत्या..