राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाला आहे.. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी हाय व्होल्टेज लढत ही चाळीसगाव मतदारसंघात होत असून कधीकाळी जवळचे मित्र असलेले मंगेश चव्हाण व उमेश पाटील आमने-सामने आले आहेत.. या निवडणुकीसाठी भाजप कडून मंगेश चव्हाण तर उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेश पाटील मैदानात आहेत.. त्यामुळे चाळीसगावच्या आखाड्यात जनतेचा कौल कुणाला असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..
दरम्यान याआधी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण यांच्याच नावाची चर्चा होताना दिसून आली.. जनतेने पुन्हा संधी दिली तर नक्कीच अजून कित्येक पटीने विकास कामे या मतदारसंघात होतील , असे आश्वासन त्यांनी दिले.. महाराष्ट्रातील चाळीसगाव विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागा पैकी 17 व्या क्रमांकावर आहे.. या मतदारसंघातून मंगेश चव्हाण आणि उमेश पाटील यांच्या थेट लढत होणार आहे त्यामुळे या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे लोकसभा निवडणुकीवेळी उमेश पाटील यांना तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करत त्यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला.. दरम्यान या निवडणुकीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ ही भाजप साठी महत्त्वाची जागा असून 1990 पासून फक्त एकच जागा सोडली तर सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या होत्या.. दरम्यान या मतदारसंघात आता भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेना उबाठा उमेदवार उन्मेष पाटील रिंगणात असून या मतदार संघात बाजी कोण मारणार हे विधानसभा निकालनंतर स्पष्ट होणार आहे..