राजमुद्रा : राज्यभरात आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी मतदार पार पडत आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे .
ठाण्यातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील मतदान केंद्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, बंधू प्रकाश शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी देखील आज ठाणे येथे मतदानाचं कर्तव्य बजावले.
शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना अशी ओळख असलेल्या ठाण्यातील कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघातून नेमका विजय कोणाचा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आत्तापर्यंत तीन वेळा या मतदारसंघातून आपले नशीब आजमावले असले तरी यंदा मुख्यमंत्री म्हणून रिंगणात असल्याने या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाला आहे.. त्यामुळे या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे..