राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडल्यानंतर रावेर मतदारसंघामध्ये आमदार पदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे..अशातचंसकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला असून या एक्झिट पोल नुसार या मतदारसंघात काँग्रेसचे पारडं जड दिसते.. काँग्रेसकडून धनंजय चौधरी निवडणूक लढत आहेत. तर भाजपाकडून अमोल जावळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, धनंजय चौधरी हे संभाव्य आमदार होऊ शकतात. तर अमोल जावळे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस गड राखणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..
विधानसभा निवडणुकीसाठी रावेर मतदारसंघात भाजपाचे हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे (Amol Jawale) यांच्याविरुद्ध काँग्रेसचे शिरीष मधुकरराव चौधरी (Shirish Chaudhary) यांचे सुपुत्र धनंजय चौधरी (Dhananjay Chaudhary), तर प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी (Anil Chaudhry), वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील (Shamibha Patil), काँग्रेसचे (अपक्ष म्हणून लढणार) दारा मोहम्मद अशी लढत झाली.. मुख्य लढतीमध्ये अमोल जावळे विरुद्ध धनंजय चौधरी रिंगणात होते..रावेर विधानसभा मतदारसंघात यावेळी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने धनंजय चौधरी तर महायुती आणि भारतीय जनता पक्षाच्या अमोल जावळे यांच्यात ही लढत झाली. आता विधानसभा निकालानंतर धनंजय चौधरी यांच्या नावाची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे..
आमदार शिरीश चौधरी यांचे सूपुत्र असलेले धनंजय चौधरी यांनी गेल्या ३-४ वर्षांपासून मतदारसंघातला आपला संपर्क वाढवला होता. प्रकृती अस्वस्थ असल्याने शिरीष चौधरी यांनी ही निवडणूक लढवायला नकार दिल्याने काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती.आमदार शिरीश चौधरी यांचा या निवडणुकांचा असलेला अनुभव त्यांनी केलेली कामे त्यांच्या कुटुंबाचं गेल्या ३ पिढ्यांपासून या मतदारसंघात असलेला विकासाचा वारसा धनंजय चौधरी यांच्यामागे असलेलं युवक संघटन आणि त्यांचे एकूणच विनम्र, उत्साही असं व्यक्तिमत्व या सगळ्या गोष्टींचा विचार करुन त्यांना विजय मि