राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे विधानसभेच्या निवडणुकीचा नुकतच मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडल्या उद्या या निवडणुकीचा निकाल लागत असून राज्यात महायुती की महाविकास आघाडीच सरकार येणार? याबाबत आता अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत दरम्यान आता “महाशक्तीकडून “प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे.. ते म्हणाले,, या निवडून येतील आम्हाला दोन्ही राष्ट्रीय पक्ष पाडण्याचा प्रयत्न करत होते. पण आम्ही त्यांना झुंजवले. राज्यात महाशक्ती निकालात टॉप राहील”, असा दावा बच्चू कडू यांनी केल्याने वरिष्ठ नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत..
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये (Mahayuti) चुरस राहिली. परंतु या दोन्ही आघाड्यांना पर्याय तिसरा बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांनी महाशक्तीच्या स्वरुपात दिला होता. राज्याच्या निकालात ‘महाशक्ती’ टॉप राहील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.महाराष्ट्रात 125 पैकी 25 जागांवर महाशक्ती टॉप राहील. राज्यात महाशक्तीच्या 10 जागा कोणत्याही परिस्थितमध्ये निवडून येतील”. सरकार आमचंच येईल. अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार येईल, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
दरम्यान विधानसभेच्या निकालाआधीच आमदार बच्चू कडू यांनीही सरकार स्थापनेबाबात मोठा दावा केल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या भुवया उंचवल्या आहेत. दुसरीकडे महायुती आपलं सरकार आणण्यासाठी जोमाने तयारीला लागल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आले आहेत.. तर भाजप ही सक्रिय झाला आहे.. मात्र उद्याच्या निकालानंतरच राज्यात जनतेचा कौल कोणाला असणार? आणि महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण असणार? हे स्पष्ट होणार आहेत..